इस्लामाबाद,
former-ambassador-abdul-basit अमेरिका आणि इस्रायलने इराणवर अण्वस्त्र विकासाच्या आरोपांवरून कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानमध्ये भविष्यातील धोक्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तानमधील धोरणात्मक वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, देशाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

इस्लामाबादला असा अंदाज आहे की, इराक आणि इराणनंतर पुढे त्यांच्यावरही अण्वस्त्र नियंत्रणासाठी दबाव येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या काही घटकांकडून पुन्हा एकदा आक्रमक विचारसरणी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचा भारतातील माजी राजदूत अब्दुल बासितने एका वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य केले. त्याच्या मते, जर कधी पाकिस्तानवर अमेरिका हल्ला करेल, तर त्यास प्रत्युत्तर म्हणून भारतातील मोठ्या शहरांवर कारवाई केली जाऊ शकते, असे त्यानी सूचित केले. former-ambassador-abdul-basit त्याने पुढे सांगितले की, पाकिस्तान सध्या अमेरिकेसारख्या किंवा इस्रायलसारख्या शक्तींना थेट लक्ष्य करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे, अशा परिस्थितीत भारतासारखा शेजारी देश लक्ष्य बनू शकतो, असे त्यानी नमूद केले.
माजी राजदूताच्या या विधानावरून पाकिस्तानमधील काही घटकांची मानसिकता स्पष्ट होत असल्याचे मानले जाते. भारतातील प्रमुख शहरांचा उल्लेख करत त्यानी अप्रत्यक्षपणे दहशतवादी हल्ल्यांची शक्यता सूचित केल्याचेही विश्लेषकांचे मत आहे. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, अशा प्रकारची वक्तव्ये केवळ वैयक्तिक नसून ती देशातील लष्करी आणि धोरणात्मक विचारसरणीचे प्रतिबिंब असू शकतात. former-ambassador-abdul-basit त्यामुळे या वक्तव्यांमुळे भारताच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा सतर्कता वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, अमेरिकेतील एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने पाकिस्तानला अमेरिकेसाठी गंभीर धोका मानले असल्याचे वक्तव्य केल्याने या संपूर्ण परिस्थितीला नवे परिमाण मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे.