माईंदे चौक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
नऊ नागरिकांना चावा : नगर परिषद प्रशासन निष्क्रिय 

यवतमाळ, 
crushed dog शहरातील माईंदे चौक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः दहशत माजवली असून, महिला बँकेच्या मागील बाजूस अपार्टमेंट परिसरात तब्बल ९ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या विरोधात शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष संजय उपगनलावार यांनी तीव‘ आंदोलनाचा इशारा दिला आहे. या भागात आधीपासूनच भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून, आता पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिस्थिती आणखी झाली आहे.
 
 

dog
 
crushed dog  घटना समजताच शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष संजय उपगनलावार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांशी चर्चा केली. त्यांनी यवतमाळ नगर परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, कुत्रे पकडण्याचा परवाना नसल्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही, असे सांगत प्रशासनाने हात वर केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, ज्या नागरिकांना कुत्र्याने चावा त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन उपचार घ्यावे लागले. संबंधित नागरिकांनी उपचाराचे कागदपत्र दाखवत प्रशासनाकडे तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिक हतबल आहेत.
 
 
crushed dog  माईंदे चौक परिसरात कुत्र्यांची टोळकी रस्त्यावरच बसून, वाहने पाहताच त्यांच्या अंगावर धावून जात असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अनेक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. येथील संकटमोचन मार्ग, समर्थवाडी, शिवाजीनगर, गिलाणीनगर, दहिवलकर प्लॉट्स यासह शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा त्रास वाढला असून याविरोधात लवकरच तीव‘ आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय उपगनलावार यांनी दिला आहे.
काठ्या-दगड घेऊन नागरिकांचे स्वरक्षण
यवतमाळ नगर परिषदेची कोणतीही मदत न मिळाल्याने माईंदे परिसरातील नागरिकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हातात काठ्या व दगड घेण्यास सुरुवात केली आहे. पिसाळलेल्या कुत्र्यामुळे जीविताला धोका निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले असून, ते हातात काठ्या आणि दगड घेऊनच घराबाहेर पडत आहेत. नप प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.