पवनार येथे अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेले Datta Meghe दत्ता मेघे विदर्भाचे नेते झाले. फ्रुटकांडी विक्रेते, आयुर्विमा महा मंडळात विकास अधिकारी, आमदार, खासदार ते मंत्री असा स्व कर्तृत्वावार आलेख उंचावत गेलेले दत्ता मेघे वर्धेकराचा आधार होते. गुढीपाडव्याला वर्धेत १९ रोजी आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमाला दत्ता मेघे यांनी पहाटे ५ वाजता हजेरी लावली होती.
वर्धेत अनेक धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाना त्यांची सढल हाताने मदत राहत होती. श्रीराम मंदिर आणि श्रीराम मंदिर शोभा यात्रा समितीच्या वतीने आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमाचे ते १८ वर्षापासून आश्रयदाते होते. विशेष म्हणजे त्यांनी पहाटे ५ वाजता सुरू होणाऱ्या पाडवा पहाट कार्यक्रमला ते हमखास हजेरी लावत असे गुरुवारी झालेल्या कार्यक्रमातही त्यांची उपस्थिती होती. अनेक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती म्हणजे घरातील मोठ्या व्यक्तीची उपस्थिती समजले जात होते. गेल्या जून महिन्यात त्यांनी पवणार येथील स्वतः शिकत असलेल्या प्राथमिक शाळेत भेट देऊन शाळेची दुरावस्था. बघून आर्थिक मदत केली होती आणि आपण जीवन्त असेपर्यंत शाळेला मदत करण्याचे जाहीर केले होते.
आलेल्याचे अश्रू पुसणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. निसीम गणेश भक्त असलेल्या Datta Meghe दत्ता मेघे यांनी आपल्या संस्थेत गणेश उत्सव सुरू केला. तो वर्धेकरांचा उत्सव झाला आहे. या उत्सवाच्या निमित्तामे त्यांनी वर्धेत मोठंमोठे चित्रपट कलावन्त आणले. गणेश विसर्जन मिरवणुकीत ते चित्रपट अभिनेता खुल्या जीपमधून सहभागी होत होते. राजकारणातील सर्व पद त्यांनी उपभोगले पण राज्यपाल होण्याची त्यांची ईच्या अपूर्ण राहिली. आपण तिरंगातच जाऊ असे ते बोलून दाखवत असे... त्यांनी अनेकांच्या ईच्या पूर्ण केल्या पण त्यांची राज्यपाल होण्याची ईच्या अपूर्ण राहिली.