मुंबई,
dharavi-murder-case मुंबईतील धारावी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पार्किंगवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट प्राणघातक हल्ल्यात झाले असून, या घटनेत २२ वर्षीय तरुण अश्विन नाडर याचा मृत्यू झाला आहे. ही घटना १६ मार्च रोजी घडली. स्कूटर पार्किंगवरून सुरू झालेल्या वादातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात तरुणावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला.

घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या दृश्यांमध्ये आरोपी आशिक खानने अश्विनला दोरीने गळा बांधून जमिनीवर ओढत नेत त्याच्यावर मारहाण केल्याचे दिसते. dharavi-murder-case गंभीर जखमी अवस्थेत असलेला अश्विन सतत मदतीसाठी विनवणी करत होता, तरीही हल्ला थांबला नाही. या वेळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी हस्तक्षेप न करता आरोपीला पाठिंबा दिल्याचेही समोर आले आहे. तसेच, मदतीसाठी पुढे येणाऱ्या काही लोकांना धमकावून दूर करण्यात आले, अशी माहितीही मिळत आहे. गंभीर जखमी अवस्थेत अश्विनला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सौजन्य : सोशल मीडिया
पोलिसांनी मुख्य आरोपी आशिक खान याला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. dharavi-murder-case सध्या पोलीस या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत. समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि पूर्वनियोजित क्रूरतेचे असल्याचे मानले जात असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.