44 लाखाच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
कार मागणाऱ्या सासरच्या चाैघांविराेधात गुन्हा
 
अनिल कांबळे
नागपूर, 
Dowry harassment लग्नात मुलीच्या वडिलांनी फारसा मानपान न केल्याने तसेच माहेरुन 44 लाख रुपये आणि कार आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक, मानसिक छळ करण्यात आला. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने माहेर गाठले. या प्रकरणात विवाहितेच्या तक्रारीवरुन गिट्टीखदान पाेलिसांनी लाेभी पतीसह सासू, सासरा आणि भावजयी विराेधात गुन्हा दाखल केला.
 
 
MADKSL
 
साेनाली (31) असे Dowry harassment  हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ साेसणाèया विवाहितेचे नाव आहे. गिट्टीखदान पाेलिस हद्दीतील के. टी. नगरातील रहिवासी साेनाली यांचा तीन वर्षांपूर्वी 2023 मध्ये झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातल्या माेराबादी येथील आशिषअमन अजय लाल साेबत विवाह झाला. साेनाली यांच्या कुटुंबियांनी रितीरिवाजानुसार थाटात विवाह केला हाेता. मात्र लग्नात मुलीच्या कुटुंबाने याेग्य मानपान न केल्याने लाेभी पती आशिष, सासू उषा अजयलाल (55), सासरा अजय लाल (60), भावजय स्वाती लाल, (33, सर्व रा. दुर्गा पॅलेस, माेराबादी, जि. रांची, झारखंड) हे साेनाली यांचा सतत छळ करत हाेते. ते साेनाली यांना माहेरहून 44 लाख रुपये व कारची मागणी करत हाेते. लग्नात साेनाली यांच्या कुटुंबियांनी जवळपास 90 लाख रुपये खर्च केला हाेता. तरीही लाेभी पती, सासू, सासरा आणि भावजय सतत साेनाली यांचा छळ करत हाेते. दरम्यान सासरच्यांनी साेनाली यांच्या आईवडिलांशी भांडण करून शिविगाळ केली. त्यामुळे वैतागलेल्या साेनाली यांनी गिट्टीखदान पाेलिस ठाणे गाठत तक्रार केली. पाेलिसांनी हुंडा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.