गंगाधरराव फडणवीस यांचे कार्य सत्त्वशिल

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
सरसंघचालक डॉ. भागवत यांचे गौरवोद्गार
डायग्नोेस्टिक सेंटरचे थाटात लोकार्पण
 
नागपूर, 
जीवनात सत्व महत्त्वाचे आहे. असे सत्वशिल आणि ज्यांच्या करण्यामुळे इतर कार्यकर्त्यांच्या सत्वाची पायाभरणी झाली, असे प्रकृतीने संघटक लोकसंग‘ही गंगाधरराव होते, असे गौरवोद्गार रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काढले. साधनांची कमतरता व अनेक अडचणी असतानाही, प्रामाणिकपणा, निःस्वार्थ वृत्ती, सत्त्वप्रधान राहून गंगाधरराव फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्व व संघटन कौशल्याच्या जोरावर समाजकार्य केले. सेवा हे नराने नारायण होण्यासाठी केलेले कार्य आहे. असे लोकसंग्रही असलेले गंगाधरराव यांच्या नावाने सुरू झालेला उपक्रम अत्यंत औचित्यपूर्ण आहे, असेही डॉ. मोहनजी म्हणाले. श्री सिद्धी विनायक सेवा फाऊंडेशनतर्फे वर्धा रोडवरील पावनभूमी परिसरात मध्य भारतातील सर्वात मोठे गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आज झाले.
 

Mohan ji 
 
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची आई सरिता फडणवीस, केंद्रीय नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. माया इवनाते, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री पंकज भोयर, आशीष जयस्वाल, आ. आशीष देशमुख, श्री सिद्धीविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष आ. संदीप जोशी, महापौर नीता ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी गंगाधरराव फडणवीस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व कोनशिलेचे अनावरण मोहनजींनी केले. त्यानंतर शेजारच्या मैदानात जाहीर झाला. डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, सेवा ही उपकार नसून कर्तव्य आहे. आपण सेवा करतो तेव्हा आपण स्वतः पवित्र होत असतो. माणसाचे मन स्वाभाविकपणे विविध विचारांनी भरलेले असते. पण, सेवेमुळे चित्तशुद्धी होते, असे विशद करून सेवा भावाने सुरू केलेल्या या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
 
 
स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे कार्यकर्तृत्व पिढ्यांना कळावे, त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा हे या केंद्राला त्यांचे नाव देण्याचे मुख्य कारण आहे, असे सांगत आ. संदीप जोशी यांनी प्रास्ताविकातून समाजातील तळागाळातील व मध्यमवर्गीय रुग्णांनी गरजेच्या वेळी या अद्ययावत व माफक दरातील डायग्नोस्टिक सेंटरचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यात योगदान देणार्‍या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
 
 
Dr. Mohanji Bhagwat  : दीपप्रज्वलनानंतर भाग्यश्री बारस्कर व चमूने ‘इतनी शक्ती हमे देना’ ही प्रार्थना सादर केली. आ. योगेश सागर, आ. कृष्णा खोपडे, आ. प्रसाद लाड, महानगर संघचालक राजेेश लोया, माहिती आयुक्त गजानन निमदेव, ज्येष्ठ होमिओपॅथ पद्मश्री डॉ. विलास डांगरे, उदयभास्कर नायर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. प्रमोद गिरी, किशोर जोरगेवार, आ. चैनसुख संचेती, नाना श्यामकुळे व अनेक मान्यवरांसह भरगच्च उपस्थिती होती. रेणुका देशकर, श्री सिद्धीविनायक सेवा फाऊंडेशनचे पराग सराफ, वासंती देशंपाडे, अ‍ॅड. अक्षय नाईक, रितेश गावंडे, मिनल काळे, संदीप बारस्कर, अनिरूद्ध भगत, महेन्द्र भूगावकर, नगरसेवक सुनील दांडेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
वडीलच प्रेरणास्त्रोत :
आपण लहान वयात वडिलांचे जेवढे कार्य पाहिले, त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला. त्यातूनच राष्ट्रीय विचार व समाजसेवेची भावना आपल्यात रुजली. त्यामुळे वडीलच आपले खरे प्रेरणास्त्रोत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आधुनिक व अद्ययावत आरोग्य सेवा नागरिकांना देणार्‍या या केंद्राप्रति समाधान व्यक्त केले. संदीप जोशी यांचे आभार मानत भविष्यात या सेवांचा आणखी विस्तार करण्याचे सूचवले.
 
गंगाधररावांचे योगदान मोठे: नितीन गडकरी
भाजपाच्या वाढ, विस्तारामध्ये गंगाधरराव यांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्षाचा विस्तार केला. गंगाधरराव यांच्या नावाने सुरू होत असलेला उपक्रम अत्यंत योग्य व समाजोपयोगी आहे. सर्वसामान्यांना व सुलभ आरोग्य सेवांची गरज आहे. सेवा ही आयुष्यात सर्वोपरि आहे. ‘हॅपीनेस इंडेक्स’ वाढवण्यासाठीही अशा उपक्रमांवर काम करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.