इतरांना बदलण्याऐवजी विचारांना बदलवा

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
मानसपोचार तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांचे प्रतिपादन
‘वर्ल्ड हॅपिनेस’ दिनानिमित्त माईंड हेल्थ कार्ड
मानसिक स्थिरतेच्या टिप्स

यवतमाळ, 
इतरांनी बदलले पाहिजे, ही व्यर्थ अपेक्षा बाळगण्यापेक्षा स्वतःच्या विचारांमध्ये बदल केला पाहिजे, मानसिक स्थिरतेसाठी ही सवय अत्यंत महत्वाची आहे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ तथा समाजसेवक Dr. Shrikant Meshram डॉ. श्रीकांत यांनी केले. ‘वर्ल्ड हॅपिनेस’ दिनानिमित्त त्यांच्या यवतमाळ माईंड केअर सेंटरमध्ये पत्रकारांसाठी आयोजिलेल्या विशेष कार्यक‘मात ते बोलत होते. पत्रकारांवर समाजाची मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच त्यांचे मानसिक आरोग्य संतुलित रहावे, यासाठी वर्ल्ड हॅपिनेस दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. मेश्राम यांनी पुढाकार घेतला. त्यांना ‘माईंड हेल्थ कार्ड’ उपक‘माचा भाग बनविण्यासाठी रविवार, २२ मार्च रोजी करण्यात आले होते.
 

 maind 
 
कार्यक‘माला पत्रकार काशिनाथ लाहोरे, आनंद कसंबे, नागेश गोरख, अशोक गोडंबे, सुहास सावरकर, सचिन झिटे, रूपेश उत्तरवार, किरण कोरडे तसेच सचिन कावरे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना डॉक्टरांनी या उपक‘मामागील मानस व्यक्त केला. वेगवेगळ्या उदाहरणातून त्यांनी इतरांशी तुलना किंवा स्पर्धा करणे, ईर्ष्या बाळगणे, कुठलीही शहानिशा न करता मतं बनविणे, अपेक्षाभाव ठेवणे यासार‘या मानवी व्यवहारांची उकल केली. या सार्‍यांचे व्यक्तिमत्वावर होणारे वाईट परिणाम आणि त्यावर मानसशास्त्रीय उपाययोजना सांगितल्या. वैयक्तिक आयुष्य, कामकाज, नातेसंबंध, मित्रपरिवार आणि समाजात वावरताना आपले मनोस्वास्थ कसे संतुलित ठेवावे, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
 
 
Dr. Shrikant Meshram मनाच्या निरामयतेसाठी आहार, विहार, ध्यान आणि छंद जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले. स्मार्टफोनचा हे आजचे सर्वाधिक घातक व्यसन आहे. तेव्हा यापासून स्वतःला दूर ठेवा आणि रोजच्या जीवनात लवचिक रहा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविक क्लिनिकल सायकॉलॉजी इंटर्न अमित कांबळे यांनी केले, तर आभार पत्रकार नागेश गोरख यांनी मानले. पत्रकारांना ‘माईंड हेल्थ कार्ड’ देऊन कार्यक‘माचा समारोप करण्यात आला. कार्यक‘मासाठी हॉस्पिटलचे प्रशांत सोनटक्के, तोडासे, रेश्मा मेश्राम व शुभांगी वाघमारे यांनी परिश्रम घेतले.