यवतमाळ,
Farmers on MahaDBT portal कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२५-२६ अंतर्गत विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत क्षेत्र विस्तार घटकांतर्गत १ हेक्टर ते ४ हेक्टरपर्यंत मोठी रोपवाटिका, मसाला पिकामध्ये हळद, अद्रक लागवड व मिरची लागवड करणे, पुष्पोत्पादन घटकांतर्गत झेंडु लागवड, गॅलरर्डीया, निशीगंधा, लिली इ. लागवड करणे, आळिंबी उत्पादन करणे, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन घटकांतर्गत आंबा, संत्रा, मोसंबी, चिकू, आवळा, पेरु इ. लागवड करणे, तसेच औषधी व सुगंधी वनस्पतीची लागवड करणे, मधुमक्षिका पालन करणे.
Farmers on MahaDBT portal जलस्त्रोताचे साधने सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळ्यासाठी अस्तरीकरण करणे, नियंत्रित शेती घटकांतर्गत प्लास्टिक मल्चिंग, शेडनेट हाऊस उभारणी, पॉलीहाऊस उभारणी, फळपिकांसाठी पक्षीरोधक गारपीठ रोधक जाळी आणि यांत्रिकीकरण घटकांतर्गत स्नॅपसॅक स्प्रेअर, पॉवर टिलर, २० अश्व शक्तीपर्यंत ट्रॅक्टर, मानव अवजारे इ. घटकांकरीता अनुदान देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून वाढीव अनुदान मर्यादेनुसार शेतकर्यांना अनुदान देण्यात येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी महाडीबीटीच्या पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.