नागपूर,
Shri Hanuman Temple श्रद्धानंद पेठ येथील श्री हनुमान मंदिरात विजय देशपांडे, स्वरा देशपांडे-खंडकर आणि आर्या देशपांडे यांच्या सादरीकरणातून ‘गीत रामायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तबल्यावर प्रमोद बावणे, सिंथेसायझरवर राहुल मानेकर तर तालवाद्यांवर जगदीश अयाचित यांनी उत्कृष्ट साथसंगत दिली. देवयानी केळकर यांच्या निवेदनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी आणि रंजक ठरला.
कलाकारांनी सादर केलेली सर्व गीते प्रभावीपणे सादर करत उपस्थित भाविकांना प्रत्यक्ष रामराज्याची अनुभूती दिली. वस्तीतील भाविकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. Shri Hanuman Temple कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुंडूभाऊ जोशी, सतीश पितळे, जुगादे आणि वेलणकर यांनी कलाकारांचे स्वागत केले.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र