देवळीत पाडवा पहाटचा भतिमय उत्सव

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
विकास संकल्पनेची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत
 
देवळी, 
Gudi padava मराठी नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर देवळी शहरात विहिंप बजरंग दलाच्या वतीने पाडवा पहाट कार्यक्रम उत्साहात पार पडला. नवचैतन्य, परंपरा आणि भतिभाव यांचा सुरेख संगम देवळीकरांना अनुभवायला मिळाला. पहाटेच आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा यांच्या हस्ते गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. आंब्याच्या पानांचे तोरण, रांगोळ्यांची सजावट आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर सुशोभित झाला होता. पारंपरिक वेशभूषेत देवळीकर सहभागी झाले होते.
 
 
gudi
 
Gudi padava  संगीतमय पाडवा पहाट मध्ये झी टीव्ही फेम गायक भूषण जाधव व गायिका प्रिया वैद्य यांनी सादर केलेल्या भतिगीतांनी वातावरण भारावून गेले. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, विठ्ठल भतिपर अभंग तसेच शिवचरित्रावर आधारित गीतांनी उपस्थितांच्या मनात उत्साह संचारला होता. विठ्ठल विठ्ठलच्या गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात भतीची अनुभूती देवळीकरांनी घेतली. याप्रसंगी आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, समाजसेवक मोहन अग्रवाल, एस. एम. डब्लू. इस्पातचे दीपक सुमड, बजरंग दल जिल्हासंयोजक महेश राऊत, विनोद घिया, जब्बार तवर, अमित सुराणा, संतोष भोयर, प्रेमेंद्र ढोक, अमित ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. बकाने म्हणाले,
 
 
 
Gudi padava  गुढीपाडवा हा सण नवीन संकल्प, एकजूट आणि प्रगतीचा संदेश देणारा आहे. देवळीच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन केले. तर रामदास तडस यांनी परस्पर जिव्हाळा निर्माण करत देशाला मजबूत करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक मोहन जोशी तर आभार ज्ञानेश्वर काळे यांनी मानले. या सोहळ्यात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी दिनेश क्षीरसागर, गजानन महल्ले, गोल्डी बग्गा, प्रशांत पट्टे, प्रवीण तेलरांधे, गजानन मेंडुले, एकता क्षीरसागर, भरत पांडे, विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.