संत संस्कृतीने हिंदू समाजाला एका सुत्रात ठेवले : प्रा. लोहे

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
समुद्रपुरात विशाल हिंदू संमेलन
 
समुद्रपूर, 
Hindu Sammelan महाराष्ट्रात संतांचे अफाट कार्य आहे. त्या संतांच्या भतीच्या प्रवाहामुळेच आज आपली हिंदू संस्कृती जिवंत आहे. गावातील मंदिर, घरचे देवघर यांनी सुद्धा हिंदू संस्कृती जिवंत ठेवली. हिंदू धर्माची परंपरा व सनातन संस्कृतीच्या परंपरेचे जतन करून समाजात नवचैतन्य निर्माण करणे हाच या संमेलनाचा उद्देश होता, असे मत रा. स्व. संघाचे प्रचारक प्रा. सुभाष लोहे यांनी व्यत केले. समुद्रपुरात आयोजित विशाल हिंदू संमेलनात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळकृष्णा काळे महाराज होते. तर विशेष अतिथी म्हणून रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, तालुका संघचालक रवी गाठे, प्रमोद हंबर्डे, मंडळ अध्यक्ष शेषराव तुळणकर, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, शिला सोनारे, रवींद्र लढी, पंजाब तुळणकर, प्रा. मेघश्याम ढाकरे, महिला आघाडीच्या समीक्षा मांडवकर, कमलाकर भुरे उपस्थित होते.
 
 
Hindu
 
Hindu Sammelan  या संमेलनाच्या अनुषंगाने भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला. यामध्ये विविध गावच्या दिंड्या, भजन मंडळी सहभागी झाल्या होत्या. भगवा ध्वज हातात घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम, जयश्रीराम व हर हर महादेवच्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. या संमेलनात मोठ्या संख्येने महिला, पुरुष, तरुण-तरुणी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी अक्षय तिवाडे, मिलिंद वैद्य, मोहन गिरडे, रजत भुरे, शंकर आत्राम, विकी बारेकर, श्रीकांत महाबुधे, गजानन पिसे, प्रसाद पंत, कैलास गवळी, पांडुरंग गुरनुले, राम काळे, आशिष अंड्रस्कर, प्रफुल्ल कुडे, गजानन डगवार, बालू बावणे, संदीप भोले, आदींनी सहकार्य केले.