लोकायुक्तांच्या आदेशानंतरही महागाव-फुलसावंगी रस्त्याचा केवळ चौकशीचा ‘फार्स’
दिनांक :22-Mar-2026
Total Views |
महागाव,
Mahagaon to Phulsavangi road महागाव ते फुलसावंगी या रस्त्याच्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कोट्यवधी रुपयांचा भ‘ष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई येथील लोकायुक्त कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीसाठी आलेल्या पथकाने तक‘ारदाराचे मत न घेताच पळ काढल्याने आता या तपास प्रकि‘येवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महागाव फुलसावंगी दरम्यान झालेल्या रस्ते कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, रस्ता अल्पावधीतच उखडला आहे. या निकृष्ट कामामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून फुलसावंगी व काळीटेंभी येथील पुलाचे बांधकामही धोकादायक स्थितीत आहे.
(संग्रहित छायाचित्र )
या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात होत असल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. या विरोधात जगदीश नरवाडे यांनी पुराव्यांसह कार्यालयाकडे तक‘ार केली होती. लोकायुक्तांच्या आदेशानुसार, क्वालिटी कंट्रोल अधिकारी वैभवी वैद्य यांनी महागाव येथे येऊन रस्त्याची पाहणी केली. मात्र, ही पाहणी पारदर्शक झाली नसल्याची नरवाडे यांची तक‘ार आहे. तक‘ारकर्ते नरवाडे माहिती देण्यासाठी विश्रामगृहावर पोचले असता, संबंधित अधिकारी फराळ करत होते. यावेळी तक‘ारदाराशी चर्चा करण्याऐवजी अधिकारी मागील दाराने निघून गेले. वेळा दूरध्वनी करूनही अधिकार्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा आरोप नरवाडे यांनी केला आहे.
Mahagaon to Phulsavangi road रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. ही पाहणी केवळ नावापुरतीच होती का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला अधिकार्यांनी केवळ चौकशीचा ‘फार्स’ केल्याने या रस्त्याच्या भ‘ष्टाचार प्रकरणाची पुन्हा एकदा नि:पक्ष आणि प्रामाणिक पथकामार्फत चौकशी करण्यात यावी. संबंधित कामाच्या बिलांवर सह्या करणारे दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कठोर कायदेशीर कारवाई करून वसुली व्हावी, त्याच ठेकेदाराकडून रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी जगदीश नरवाडे यांनी केली या प्रकरणात आता लोकायुक्त कार्यालय काय भूमिका घेते आणि या भ‘ष्ट कारभारावर चाप बसणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.