पिपरा नगरात वीजपुरवठा बंद

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Pipra Nagar Panchayat पिपरा नगर पंचायत हारदीप परिसरात 18 मार्च रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेमुळे नागरिक अंधारात राहिल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.मिळालेल्या माहितीनुसार, नगर पंचायत क्षेत्रातील 1 ते 17 क्रमांकाच्या पुराण्यांमध्ये वीजपुरवठा बंद होता. रात्रीच्या वेळी अचानक वीज गेल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

light 
 
घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र, अद्याप महावितरणकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन देण्यात आलेले नाही.Pipra Nagar Panchayat दरम्यान, या समस्येकडे नगर पंचायत प्रशासन व महावितरणने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
सौजन्य:मंदार चुटे ,संपर्क मित्र