पुणे
Pune heatwave forecast गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुण्यातील हवामान उकाड्याच्या झळेत रूपांतरित होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवसांत शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ होईल.
पुण्यात किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारी कडक उन्हाळा होता, पण सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ढग दाटले तरी पावसाने हजेरी लावली नाही. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवसात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून तापमानात वाढ होईल.रविवारी (ता. २२) किमान तापमान १८ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोमवारपासून पुढील तीन दिवस कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
राज्यातील इतर Pune heatwave forecast भागांमध्येही उष्णतेत वाढ जाणवली आहे. काही दिवसांपूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान राहिले होते. सोलापूर येथे ४०.१ अंश, मालेगाव ४०.० अंश, ठाणे-बेलापूर औद्योगिक परिसर ३९.८ अंश, जळगाव ३९.४ अंश आणि परभणी ३९.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. आता पुन्हा एकदा पुण्यात उकाड्याची तीव्रता वाढणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.