मुंबई
Rohit Pawar राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या रिक्त जागी कोणाची नियुक्ती होईल, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे काही संभाव्य नामनिर्देश सुचवले आहेत.
रोहित पवार म्हणाले की,Rohit Pawar महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फक्त प्रसिद्धीसाठी नाव असलेली व्यक्ती नको, तर कायद्याचे सखोल ज्ञान असलेली आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान करणारी अनुभवी व्यक्ती निवडणे गरजेचे आहे. त्यांनी असेही नमूद केले की, पीडित महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी ही पदे अराजकीय असणे आवश्यक आहे.
त्यांनी अध्यक्षपदासाठी पुढील चार नावांचा आग्रह धरला आहे
मीरा बोरवणकर : निवृत्त आयपीएस अधिकारी, निर्भिड आणि निष्पक्ष प्रतिमेसाठी परिचित.
ॲड. वर्षा देशपांडे : सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्क आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय.
मनिषा गुप्ते : 'मासूम' संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात योगदान.
मेधा गाडगीळ : निवृत्त आयएएस अधिकारी, प्रशासकीय अनुभवाचे खांब.
रोहित पवारांनी Rohit Pawar या नियुक्ती प्रक्रियेत भाजपने हस्तक्षेप करू नये असा अप्रत्यक्ष टोला देखील लगावला आहे. निर्णय पूर्णपणे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हातात असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जर वरील नावांपैकी किंवा त्यासारख्या योग्य व्यक्तीची नियुक्ती झाली, तरच एखाद्या वाईट परिस्थितीतून काहीतरी चांगले घडले असल्याचे समाधान मिळेल.रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महायुती सरकार या महत्त्वपूर्ण पदावर कोणाची नियुक्ती करेल, हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.