शकीराची इंडिया कॉन्सर्ट स्थगित

इराण-इस्रायल तणावामुळे निर्णय

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
मुंबई  
Shakira ग्लोबल पॉप स्टार शकीराचा एप्रिलमध्ये होणारी ’फीडिंग इंडिया कॉन्सर्ट’ सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. आयोजकांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि इराण-इस्रायल युद्धाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
shakira 
कॉन्सर्टच्या नवीन तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. शकीरा मुंबईत 10-11 एप्रिल रोजी आणि दिल्लीत 15 एप्रिल रोजी परफॉर्म करणार होती. यापूर्वी अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टचा कॉन्सर्टही भारतात दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला होता.
Shakira कॉन्सर्ट आयोजक ’डिस्ट्रिक्ट’ने इंस्टाग्रामवर एक लांब पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे, ‘सध्याची भू-राजकीय परिस्थिती आणि प्रादेशिक तणावामुळे शकीराचा कॉन्सर्ट पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. आमच्यासाठी चाहते, कलाकार आणि प्रोडक्शन टीमची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे.‘
Shakira आयोजकांनी सांगितले की, ते शकीराच्या टीमसोबत मिळून नवीन तारखांवर काम करत आहेत आणि काही अंतिम होताच त्याची माहिती दिली जाईल.