बोथ येथील घटना : ५ आरोपी पकडले
दारव्हा,
जुन्या वादातून दारव्हा बोथ येथील Shivani Jadhav murder case शिवानी पंकज जाधव या ७ वर्षीय मुलीचा तिच्या शेजार्यांनीच खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन शिवानी जाधव हिचे अपहरण झाल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात नीलेश नथ्थुसिंग जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक कुमार चिंता तपास सबंधाने दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांना जबाबदारी सोपविली होती. शनिवार, २१ मार्च रोजी अपहृत मुलीचा काही ठावठिकाणा मिळून येत नसल्याने पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी बोथ येथे स्वतः हजर राहून सर्व संशयित ग्रामस्थांच्या घराची झडती घेण्याच्या सूचना केल्या.
त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक, अपर पोलिस अधीक्षक व पथकातील अंमलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, दारव्हा ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा यांची ८ पथके तयार करुन सर्व संशयित ग्रामस्थांच्या घरांची झडती मोहीम राबविण्यात आली. घटनास्थळापासून वेगवेगळ्या भागांत पोलिसांनी ही शोधमोहीम सुरू केली होती. सोबतच श्वानपथकही असल्यामुळे श्वानाने शेजारच्या घरावरच कक्ष केंद्रीत केले होते, हे उल्लेखनीय. बेपत्ता शिवानीच्या घराशेजारीच राहणार्या कैलास याच्या या घराची झडती घेतली असता, पलंगाखाली शिवाणी हिच्या पोत्यात घालून ठेवलेला मृतदेह आढळून आला.
Shivani Jadhav murder case या प्रकरणी शेजारी कैलास विलास जाधव (वय ३०), माला विलास जाधव (वय २६), सोनी विलास जाधव (वय ३२), रंजना सोनू जाधव (वय ३०) व आणि एक अल्पवयीन मुलगा अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अंतर्गत कलम १३७ (२), १०३, २३८ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता व अपर अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक सतीश चवरे, दारव्हा ठाणेदार शिवप्रकाश मुळे, मनीष गांवडे, राठोड, धीरज बांडे, सहनिरीक्षक दिनेश गावंडे, पंकज दाभाडे, योगेश वाघमारे, उपनिरीक्षक कोरपे, देशमुख, जांभेकर व त्यांच्या सहकार्यांनी पार पाडली.