ट्रॅक्टर पलटून तीन किरकोळ, पाच गंभीर

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
जंगलापूरजवळील घटना
 
सेलू, 
Tractor accident सेलू-नागपूर महामार्गावरील जंगलापूरजवळ मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आठ मजूर जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना आज रविवार २२ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
 
 
acc
 
Tractor accident  मिळालेल्या माहितीनुसार, सेलूकडून नागपूरकडे वीज वितरण कंपनीचे साहित्य घेऊन जाणारा एम. एच. ३२ पी. १९९९ क्रमांकाचा ट्रॅक्टर जंगलापूरजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅटर अचानक पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेले मजूर अपघातात जखमी झाले. गंभीर जखमींमध्ये राहुल बागडी (१८), निर्मल बागडी (२१), राणी बागडी (१७), बलराम बागडी (१७) आणि अमित बागडी (२१) सर्व रा. कोलकाता यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णवाहिकेतून सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.