नागपूर,
Sparsh Kavitha ज्येष्ठ कवयित्री, गझलकार व साहित्य विहारच्या अध्यक्षा आशा पांडे यांनी “प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे कार्य समजून घेतले आणि त्या जाणीवेचा स्पर्श मनाला झाला, की कविता आपोआप स्फुरते आणि फुलते. अशी कविता कृत्रिम नसून ती मनाला जिवंत करते. ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये अधिक प्रगल्भ करण्याचे कार्य कविता करते,” असे प्रतिपादन केले. नवदृष्टी सभागृहात स्मिता जोशी जोहरे लिखित व ‘स्वयं प्रकाशन’तर्फे प्रकाशित ‘स्पर्श कवितेचा’ या वृत्तबद्ध काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी त्या पुढे म्हणाल्या, “वृत्त ही एक वृत्ती असते. प्रत्येक वृत्ताची वेगळी प्रवृत्ती अभ्यासली, तर काव्य अधिक सकस आणि प्रभावी होते. Sparsh Kavitha स्मिता जोशी यांच्या रचना अनुभव आणि अनुभूतींवर आधारित, सरस व प्रवाही आहेत.” कार्यक्रमात जयश्री अंबासकर यांनी काव्यसंग्रहातील विविध वृत्तांचे उदाहरण देत कविता सादर केल्या आणि त्यांचे रसग्रहण केले. कवयित्री स्मिता जोशी जोहरे यांनी मनोगत व्यक्त केले.
अस्मी बँडचे सर्जनशील संगीतकार व गायक सुबोध साठे यांनी काव्यसंग्रहातील एका गझलेला चाल देत सादरीकरण केले, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राधा जोशी यांनी मंगल स्तवन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सीमा जोशी यांनी मानले. Sparsh Kavitha कार्यक्रमाला मनीषा अतुल, धर्मेश पराते, वर्षा थोटे, गौरी शास्त्री देशपांडे तसेच काव्यरसिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवयानी संदीप जोशी, राजेंद्र हायस्कूलच्या शिक्षिका तसेच लेखक-लेखिकांचा यात समावेश होता.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र