भयानक...आसाममध्ये रुग्णवाहिका-ट्रक धडकेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
सोनितपूर,
Ambulance-truck collision in Assam आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५ वर ट्युलिप चहामळ्याच्या परिसरातून रुग्णाला रुग्णालयात नेत असलेल्या रुग्णवाहिकेची समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाशी जोरदार धडक झाली. या रुग्णवाहिकेत रुग्णासोबत त्याचे कुटुंबीयही प्रवास करत होते.अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच सहा जणांनी प्राण गमावले, तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने तेजपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सातवर पोहोचला.
 
ollision in Assam
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, मात्र बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा सुरळीत करण्यात आली.दरम्यान, मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना घडली असून पुलावरून दुचाकी खाली पडल्याने चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. पौरी गावाहून भैंसवाहीकडे जात असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा ताबा सुटला आणि ती थेट पुलावरून खाली कोसळली. या अपघातात चारही तरुण गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे दोन्ही राज्यांत शोककळा पसरली असून रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.