अनुष्का शर्मा लवकरच अल्लू अर्जुनसोबत तेलुगू चित्रपटात दिसणार

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Anushka Sharma बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अनुष्का शर्मा लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. येणाऱ्या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत दिसू शकते.
 

Anushka Sharma 
अनुष्का शर्मा तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास तयार आहे. अभिनेत्री अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटात काम करण्यासाठी चर्चा करत आहे, ज्याचे कामकाज सध्या AA22xA6’ या नावाने सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली करत आहेत, ज्यांनी शाहरुख खानसोबत ‘जवान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले होते. ८ एप्रिल २०२६ रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाच्या अधिकृत शीर्षकाची घोषणा केली जाईल. या घोषणेसाठी एक खास व्हिडिओ तयार करण्यात येईल, जो प्रेक्षकांना चित्रपटाच्या Anushka Sharma भव्य सिनेमॅटिक विश्वाची ओळख करून देईल. या व्हिडिओमध्ये अत्याधुनिक व्हीएफएक्सचा वापर केला जाणार आहे आणि चित्रपटाच्या महत्त्वाकांक्षी कथेची पहिली झलक दाखवली जाईल. या घोषणा व्हिडिओत अल्लू अर्जुन विविध अवतारांमध्ये दिसणार असून, या चित्रपटाच्या भव्यतेचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव देण्यात येईल
अनुष्काच्या या नवीन चित्रपटाच्या चर्चांमुळे तिच्या चाहत्यांच्या उत्सुकतेला आणखी धार चढली आहे. अल्लू अर्जुनसोबतच अनुष्काचा अभिनय पाहण्याची उत्सुकता सर्वत्र वाढली आहे, आणि या प्रकल्पाची अधिकृत घोषणा होईल त्यावर अनेकांचे लक्ष आहे.