वृद्धाश्रमात संगीत व नाट्याचा सुंदर संगम

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
नागपूर,
old age home पंचवटी वृद्धाश्रम, दिघोरी (नागपूर) येथे वृद्धांना मनोरंजनात्मक आनंदाचे क्षण मिळावेत या हेतूने मराठी मेलोडी ग्रुप आणि नाट्यांश ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची निर्मिती प्राचार्य उज्वला अंधारे यांनी केली होती.
 
old age home
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी नारायण जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले, तर प्राचार्य विजय देशपांडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. old age home मराठी मेलोडी ग्रुपने “केव्हा तरी पहाटे” या कार्यक्रमांतर्गत जुन्या लोकप्रिय हिंदी आणि मराठी गाण्यांचे सुमधुर सादरीकरण करून वृद्धांना आनंद दिला. तसेच नाट्यलेखिका वर्षा विजय देशपांडे लिखित “दुर्गे दुर्घट भारी” या नाट्यवाचनाने वृद्धांची मने जिंकली.
 
कार्यक्रमातील गायक कलाकारांमध्ये प्रकाश देशपांडे, मुकुंद घाटे, श्रीकांत सप्रे, उज्वला अंधारे, सुनील फरसुले, अरुणा फरसुले, पद्मजा सिन्हा, old age home मेघा हरदास, दिपाली पनके, सुचिता पडळकर, रेखा शुक्ला, सुषमा माचवे आणि कृष्णा कपूर यांचा समावेश होता. वाद्यवृंदाची साथ विवेक संगीत आणि विश्वास संगीत यांनी दिली. “दुर्गे दुर्घट भारी” या नाट्यवाचनात नारायण जोशी, वर्षा देशपांडे, रेखा शुक्ला, उज्वला अंधारे, सुनील फरसुले, अरुणा फरसुले, मोनाली देवरस आणि विशाखा खनगन यांनी सहभाग घेतला. नाट्यवाचनाची संकल्पना विजय देशपांडे यांची तर संगीत कार्यक्रमाची संकल्पना पद्मजा सिन्हा यांची होती. कार्यक्रमाच्या शेवटी वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. वृद्धाश्रमातील रजनीताई यांनी कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सौजन्य: वर्षा देशपांडे, संपर्क मित्र