पाेलिसांनी लाेकाभिमुख हाेऊन काम करावे

- भांडेवाडी ठाण्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
bhandewadi police station शहराची वाढती लाेकसंख्या, बाहेरील भागात वेगाने हाेत असलेले शहरीकरण आणि कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भांडेवाडी येथे नवीन पाेलिस स्टेशन सुरू करण्यात आले. या ठाण्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ‘पाेलिस विभागाने लाेकाभिमुख काम करावे. नागरिकांच्या समस्या साेडविण्यासाठी पाेलिसांनी तत्पर असावे. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाेलिस कर्तव्यदक्ष असावे’ असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी बाेलताना मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी आमदार कृष्णा खाेपडे, पाेलिस आयुक्त डाॅ.रवींद्रकुमार सिंगल, पाेलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अती. आयुक्त वसंत परदेशी, शिवाजी राठाेड, राजेंद्र दाभाडे आणि उपायुक्त निकेतन कदम यांच्यासह वरिष्ठ पाेलिस अधिकारी उपस्थित हाेते.
 
 

पाेलिसांनी लाेकाभिमुख हाेऊन काम करावे 
 
 
मुख्यमंत्री म्हणाले की, भांडेवाडी पाेलिस ठाण्याच्या स्थापनेमुळे या परिसरातील नागरिकांना जलद आणि प्रभावी पाेलिस सेवा मिळणार आहे. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक मजबूत हाेण्यास मदत हाेईल. या ठाण्यात अत्याधुनिक सुविधा, प्रगत तांत्रिक साधने आणि नागरिकांसाठी अनुकूल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यामुळे पाेलिस यंत्रणेची कार्यक्षमता वाढेल आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद वेळ सुधारेल, असेही त्यांनी नमूद केले.bhandewadi police station नागरिकांच्या सुरक्षेबाबत आपली बांधिलकी पुन्हा अधाेरेखित करत त्यांनी हे ठाणे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास मनपा सत्तापक्ष नेते बाल्या बाेरकर, अमाेल वाळके, नगरसेवक उपस्थित हाेते.
........
दाेन ठाण्यांचे विभाजन
पारडी आणि वाठाेडा पाेलिस ठाण्यांच्या हद्दीचे विभाजन करून नवीन भांडेवाडी पाेलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात साेनबानगर, प्रजापतीनगर, चंद्रनगर, गाेंडपुरा, काेष्टीपुरा, सराई माेहल्ला, महाजनपुरा, ठवकरवाडी, नागेश्वरनगर, अंबेनगर, उडिया माेहल्ला, मेहनगर, शैलेशनगर, देवीनगर, संघर्षनगर, सूरजनगर, पवनशक्तीनगर, श्रावणनगर, राजनगर, वाठाेडा रिंग राेड, वैष्णवदेवीनगर, चांदमारी राेड, साहिलनगर, अबूमियानगर, तुलसीनगर, बिडगाव, तराेडी बुजुर्ग आदी परिसरांचा समावेश असणार आहे.