सिंदी येथे चणा खरेदीचा शुभारंभ

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
सिंदीरेल्वे, 
chana-procurement : हंगाम २०२५-२६ अंतर्गत तूर व हरभरा (चना) पिकांची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडमार्फत राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून बाजार समिती सिंदीच्या आवारात आज १७ रोजी खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली.
 

K 
 
 
समितीचे सभापती केशरीचंद खंगारे यांच्या हस्ते काटापूजन करून खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसभापती प्रमोद आदमने, सदस्य गोपाल कोपरकर तसेच समितीचे सचिव तथा मुख्याधिकारी महेंद्र भांडारकर उपस्थित होते.
 
 
शासनाने हरभरा खरेदीचा दर रुपये ५८७५ प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला असून नाफेडच्या निकषांनुसार खरेदी करण्यात येत आहे.