धनादेश अनादर प्रकरणी तीन महिन्यांचा कारावास

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
बुलढाणा, 
cheque-dishonour-case : धनादेश अनादर प्रकरणात येथील न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत तीन महिन्यांचा सश्रम कारावास आणि २ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. बुलढाणा येथील रहिवासी संदीप अच्युतराव गवई यांनी आरोपी नरेंद्रसिंग रामसिंग राजपूत, शिक्षक, महाराष्ट्र विद्यालय, जानोरी ता. शेगाव, यांना एक लाख सत्तर हजार रुपये उसने दिले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत आरोपीने ही रक्कम परत केली नाही.
 
 
JLK
 
 
 
वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने अखेर आरोपीने फिर्यादीस १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश दिला. संबंधित धनादेश बँकेत सादर केला असता तो अनादरित झाल्याने फिर्यादीने अ‍ॅड. गुणवंत नाटेकर यांच्या मार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली. या प्रकरणी न्यायालयात सविस्तर सुनावणी झाली. सुनावणीअंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत आरोपी नरेंद्रसिंग राजपूत यास ३ दोषी ठरवले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस महिन्यांचा सश्रम कारावास तसेच २ लाख ८० हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही शिक्षा फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम २५५ (२) तसेच परक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १४३ अन्वये सुनावण्यात आली. ड. गुणवंत नाटेकर यांनी प्रभावीपणे मांडली फिर्यादीची बाजू यासोबतच न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आर्थिक व्यवहार करताना कायदेशीर जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.