व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक काम करणार्‍यांचा सन्मान होणार

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण
 
नागपूर 
CM Devendra Fadnavis सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक काम करीत असलेल्या व्यक्तींना व संस्थांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने नागपूर विभागातील १८ व्यक्ती व ३ संस्थांना सन्मानित करण्यात येणार आहे.
 
 
cm
 
हा पुरस्कार सोहळा २५ व २६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईट, मुंबई येथे CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुरस्कार प्राप्त नागपूर जिल्ह्यातील सात व्यक्तींमध्ये पक्षाभान तुकाराम ढोक, एकनाथ पवार, प्रितम भीमराव गेडाम, चरणदास बन्सी वैरागडे, प्रेमा सुधीर लेकुरवाळे, गौरव आळणे तसेच एकात्मता सामाजिक शिक्षण मंडळ, नागपूर यांचा समावेश आहे.