मुंबई
Dhurandhar The Revenge सिनेमातील धुरंधर द रिवेंजने रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर कमाल गाजवली आहे. भारतात तसेच परदेशातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, चार दिवसांत चित्रपटाने तब्बल ७५० कोटी रुपयांचा कलेक्शन साधला आहे. पेड प्रिव्ह्यूजमध्ये प्रेक्षकांचा उत्साह पाहूनच चित्रपटासाठी प्रेक्षकांचा मोठा उत्साह निर्माण होईल याचा अंदाज बांधला जात होता.
भारतातल्या पहिल्या चार दिवसांमध्ये चित्रपटाने ४५६.४९ कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केला आहे. पेड प्रिव्ह्यूजमध्ये ४३ कोटींचा कलेक्शन मिळाल्यानंतर ओपनिंग डेवर १०२.५५ कोटी, दुसऱ्या दिवशी ८०.७२ कोटी, तिसऱ्या दिवशी ११३ कोटी आणि चौथ्या दिवशी ११४.८५ कोटींची कमाई झाल्याची माहिती सीनॉलिकच्या रिपोर्टनुसार मिळाली आहे. एकूण ९५,१७१ शोमध्ये हा कलेक्शन साधला गेला आहे.
फक्त भारतातच नव्हे Dhurandhar The Revenge तर चित्रपटाला परदेशी बाजारातही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चार दिवसांच्या ग्रॉस कलेक्शनमध्ये ५४१ कोटी रुपये नोंदवले गेले असून, यापैकी २०९ कोटी रुपये फक्त ओव्हरसिज मार्केटमधून आले आहेत. यामुळे चित्रपटाचा चार दिवसांचा वर्ल्डवाइड कलेक्शन तब्बल ७५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कलेक्शनमुळे धुरंधर द रिवेंज भारतातील फर्स्ट वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ने ७६२ कोटी रुपयांचा कलेक्शन साधला होता.