डॉ. भोयर रूपात वर्धेला दिला पालकमंत्री

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
वर्धा,
dr bhoyar दत्ता मेघे यांचा राजकीय प्रवास फार रंजक आहे. राजकारण करताना त्यांनी कशाचीच पर्वा केली नाही. अगदी भारतीय जनता पार्टीत असतानाही त्यांनी शरद पवार यांच्यावरीर प्रेम जाहीर सभेतून व्यत केले आहे. काँग्रेसमध्ये असतानाही नितीन गडकरी यांचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला. राजकारणात शरद पवार यांची सावली म्हणून ओळखले जाणारे दत्ता मेघेही शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसमधून बाहेर पडले.
 
 
 
 
पंकज भोयर
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. राकाँमध्ये ते कोषाध्यक्ष होते. त्यानंतर पुन्हा दत्ता मेघे काँग्रेसमध्ये गेले. शेवटी त्यांनी सागर व समिर मेघे ही दोन मुलं आणि युवा काँग्रेसचे नेते डॉ. पंकज भोयर यांच्यासह शेकडोंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मेघे यांचे चिरंजिव सागर विधान परिषदत भाजपाचे आमदार होते. समिर मेघे यांना हिंगणा मतदर संघातून विधानसभेची तिकीट दिली. दरम्यान, वर्धेतून दत्ता मेघे यांच्यासोबत भाजपात आलेले डॉ. पंकज भोयर यांना वर्धा विधानसभेची तिकीट दिली. त्यावेळी राणा रणनवरे आणि डॉ. भोयर यांच्यापैकी कोणाला तिकीट हा विषय प्रतिष्ठेचा झाला असताना दत्ता मेघे यांनी डॉ. पंकज भोयर यांना तिकीट मिळवून दिली.dr bhoyar डॉ. पंकज भोयर वर्धा विधानसभा निवडणुकीत तिसर्‍यांदा निवडून आले. तिसर्‍या टर्ममध्ये डॉ. पंकज भोयर राज्यमंत्री आणि पुढे पालकमंत्री झाले. दत्ता मेघे यांच्यासोबत डॉ. पंकज भोयर भाजपात आल्याने वर्धा जिल्ह्याला हकाचा पालकमंत्री मिळाला असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.