मालक गंभीर जखमी : लाखोंचे नुकसान
दारव्हा,
शहरातील भगवान नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या Fierce fire भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका खाजगी पाणी शुद्धीकरण केंद्राला लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण करत संपूर्ण घर आणि व्यवसाय भस्मसात केला. या दुर्घटनेत केंद्राचे मालक आशिष गिरी गंभीररीत्या जखमी झाले असून कुटुंबातील इतर सदस्य थोडक्यात बचावले आहेत.
शनिवार, 21 मार्च रोजी रात्री दीडच्या सुमारास भगवाननगर भागातील आशिष गिरी यांच्या राहत्या घरी असलेल्या पाणी शुद्धीकरण केंद्रातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा उसळू लागल्या. रात्रीची वेळ असल्याने सुरुवातीला कुणालाही याची कल्पना आली नाही. मात्र काही क्षणातच आग भडकत गेली आणि तिने संपूर्ण केंद्र तसेच घराला आपल्या विळख्यात घेतले.
Fierce fire आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक आणि शेजाèयांनी तत्काळ धाव घेत आशिष गिरी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना घराबाहेर सुरक्षित काढले. त्यामुळे जीवहानी टळली असली तरी आगीच्या झळा बसल्याने आशिष गंभीररीत्या भाजले गेले आहेत.
दरम्यान, आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केल्याने पाणी शुद्धीकरण केंद्रातील सर्व यंत्रसामग्री पूर्णतः नष्ट झाली. घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, धान्यसाठा, कपडे तसेच इतर आवश्यक साहित्यही आगीत जळून खाक झाले. या घटनेत सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी तातडीने नगर परिषद अग्निशमन दलालाही कळविले होते. मात्र, चालक उपलब्ध नसल्यामुळे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल दीड तास उशीर झाल्याचे समोर आले.
या विलंबामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याआधीच सर्व काही भस्मसात झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे भगवाननगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून आपत्कालीन सेवांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Fierce fire अशा प्रसंगी तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असताना झालेल्या विलंबामुळे मोठे नुकसान सहन करावे लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्राथमिक स्तरावर विद्युत तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.