शांतनू चिखलेचे पाच बळी

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
- नवनिकेतन विजय
नागपूर, 
Gazdar League cricket tournament गझदर लीग क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात दहा बळी घेण्याची किमया करणार्‍या शांतनू चिखलेने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना एम. एन. दोराईराजन करंडक क्रिकेट स्पर्धेत केवळ ३.५ षटकांत केवळ १५ धावांत पाच बळी घेऊन आपली छाप सोडली. त्याच्या कामगिरीमुळे नवनिकेतन क्रिकेट क्लबने आठ गड्यांनी मात केली. पहिल्या डावात नाबाद ३७ धावांची खेळीही केली.
 
 
shantanu dksl
 
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर नवनिकेतन क्लबने पहिल्या डावात १४ धावांची आघाडी घेतली होती. शांतनू चिखलेच्या धमाकेदार कामगिरीमुळे एमआरसीसीचा दुसरा डाव ७१ धावांवर गडगडला. नवनिकेतन क्लबने ५८ धावांचे विजयी लक्ष्य दोन गडी गमावून पार केले. संक्षिप्त ः एमआरसीसी पहिला डाव २३२, पहिला डाव २४६, एमआरसीसी दुसरा डाव ७१, नवनिकेतन दुसरा डाव २ बाद ६१ (यश कदम नाबाद ३८).
 
 
Gazdar League cricket tournament कळमना मैदान ः एलेव्हन स्टार १९४, अ‍ॅडव्होकेट एकादश १६७, इलेव्हन स्टार दुसरा डाव २६९ (अनुप दुधे ३९, मल्हार दोशी १२५, अक्षय दुल्लरवार ४२, हार्दिक वर्मा ५-१००),
एस.बी. सिटी मैदान ः इंडियन जिमखाना डाव १७३, व्हीएमव्ही क्लब पहिला डाव ८०, इंडियन जिमखाना दुसरा डाव ५ बाद १७२ (प्रभळ चोखांद्रे ५५, ओम धोत्रे ४४, अनिरुद्ध चौधरी खेळत आहे ३६, कुणाल नागर ४-४०).
मध्य रेल्वे मैदान ः रेशीमबाग जिमखाना पहिला डाव २५१, किदवई क्लब पहिला डाव ३३३, जिमखाना दुसरा डाव २ बाद १३८ (प्रथमेश ४६, श्री चौधरी खेळत आहे नाबाद ६१).