राष्ट्रप्रेम,धर्मभावना निर्माण होण्यासाठी हिंदू संमेलन काळाची गरज: मोहन पांढरे

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
रिसोड, 
mohan-pandhare : हिंदू समाजाला संघटित करणे, सांस्कृतिक वारसा जपणे, सामाजिक सलोखा वाढवणे आणि धर्माविषयी जागृती निर्माण करणे हिंदू समाजात एकता,संस्कार,राष्ट्रप्रेम धर्मभावना निर्माण होण्यासाठी सकल हिंदू समाजाची संमेलने आजच्या काळाची गरज आहे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते कीर्तनकार मोहन महाराज पांढरे यांनी केले. ते रिसोड शहरातील रामनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होते.
 
 
JKL
 
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा व्यवस्था प्रमुख विष्णू इडोळे उपस्थित होते. भारत माता व छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना मोहन महाराज म्हणाले की हिंदू समाजातील तुम्हाला संस्कारित करण्याचे काम मातृशक्ती करू शकते पहिल्या पिढीतील संस्कार दुसर्‍या पिढीतील कडे नेण्याचे काम मातृ शक्तीने करावे असे आवाहन त्यांनी मातृशक्तीला केले.
 
 
विष्णूजी इढोळे यांनी पंच परिवर्तनाबाबत बोलताना कुटुंब ही समाजाची मूलभूत एकक आहे. कुटुंबात प्रेम, संस्कार परस्पर आदर आणि जबाबदारीची भावना वाढवणे आवश्यक आहे.मुलांना चांगले संस्कार देणे, एकत्र बसून चर्चा करणे, वडीलधार्‍यांचा सन्मान करणे आणि कुटुंबात सुसंवाद राखणे यामुळे सुदृढ समाजाची निर्मिती होते. स्वदेशी, स्वदेशीचा अर्थ म्हणजे आपल्या देशात तयार होणार्‍या वस्तूंचा वापर वाढविणे आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते आणि स्वालंबन वाढते. झाडे लावणे, पाणी व वीज वाचवणे प्लास्टिकचा कमी वापर करणे आणि स्वच्छता राखणे यामुळे निसर्गाचे संतुलन टिकून राहते असे इढोळे यांनी सांगितले.
 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्निल साखळे आणि संचालन निळकंठ देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन मोहन शिंदे यांनी केले. भारत मातेची आरती करून प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हिंदू प्रेमी जनता उपस्थित होती.