अनेक चित्रपट अभिनेत्यांचे वर्धेकरांना घडवले दर्शन

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
वर्धा,
wardha-news : वर्धेच्या विकासात दत्ता मेघे यांचा मोठा हातभार आहे. सावंगी (मेघे) परिसरात त्यांनी शैक्षणिक सांम्राज्य उभे केले. त्या पाठोपाठ वैद्यकीय सेवाही त्यांनी सुरू केल्या. सावंगी येथील राधिकाबाई मेमोरिअल ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थेमध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठा गणेश उत्सव त्यांनी सुरू केला. सर्वात मोठा गणपती त्यांच्याच परिसरात तयार होता होता.
 
 
K
 
 
 
गणेश स्थापना ते गणेश विसर्जन हे दहा दिवस त्यांचा वर्धेत मुकाम राहत होता. या काळात ते वर्धेतील अनेक घरी गणपती आणि महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी जात होते. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत प्रसिद्ध अभिनेत्याला आणण्याची परंपरा त्यांनी अनेक वर्षे जोपासली होती. सावंगी (मेघे) येथुन गणपती बजाज चौकात येत होता. त्यानंतर बजाज चौकातून ढोल ताश्यांसह मिरवणूक निघत होती. उघड्या जीपमध्ये स्वत: दत्ता मेघे आणि चित्रपटांमधील नट राहत असल्याने गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होत होती. या मिरवणुकीत गढे यांचा पानठेला आल्यानंतर ते अभिनेत्यासह जीपमधून खाली उतरत पान खात होते. १९९६ मध्ये विठ्ठलराव बढे पानठेल्यात पान लावत असताना गणेश मिरवणूक आली. दत्ता मेघे चित्रपट अभिनेता घेऊन राजेश खन्ना याला घेऊन पानठेल्यावर आले. त्यांनी पान खाल्ले असे अनेक हिरो आपल्याकडे पान खाण्यासाठी दत्ता मेघे घेऊन आले अशी माहिती चंद्रकांत बढे यांनी राजेश खन्ना यांची भेट असलेला फोटा दाखवत सांगितली.