मुंबई,
Satara Zilla Parishad elections सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अनपेक्षित विजय मिळाला आहे. भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्षपदावर आणि राजू भोसले उपाध्यक्षपदावर निवडून आले. मात्र या विजयाभोवती निर्माण झालेला राजकीय गोंधळ आता स्थानिक तसेच राज्यस्तरीय राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान विरोधकांच्या आणि पक्षांतर्गत वादामुळे वातावरण तणावपूर्ण झाले
निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये मतमंथन व तणावाचे दृश्य पाहायला मिळाले. काही मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यापासून वंचित ठेवण्यात आले, तर काही सदस्य पोलिसांच्या हस्तक्षेपाखाली आले. विरोधकांनी पोलिस कारवाईवर प्रश्न उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर शंका व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांना पोलिसांबरोबर थेट संघर्षाचा सामना करावा लागला. या घटनांमुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली.मात्र, आता याच सर्व गोंधळाचे पडसाद थेट राज्याच्या विधान परिषदेत उमटले आहेत. विधान परिषदेत पोलिसांच्या Satara Zilla Parishad elections अरेरावीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री शंभूराज देसाई यांनी थेट पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह इतर शंभर पोलिसांचं निलंबन करावं अशी मागणी देसाई यांनी केली.