बॅडमिंटन स्पर्धेत शरदने पटकाविले रौप्य व कांस्य

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
नागपूर, 
Sharad Mahajan ज्येष्ठ बॅडमिंटनपटू शरद महाजनने मनोहर पर्रीकर बहुउद्देशीय क्रीडा संकुलात १८ ते २२ मार्च दरम्यान आयोजित योनेक्स सनराईज मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन प्रभावी कामगिरी केली. ७०+ गटात खेळताना, महाजनने पुरुष दुहेरीमध्ये रौप्य पदक आणि पुरुष एकेरीमध्ये कांस्य पदक पटकावून आपल्या शानदार कारकिर्दीत आणखी एका यशाचा मानाचा तुरा खोचला. ७०+ गटात विद्यमान राज्य विजेता व राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता ठरलेल्या महाजनने संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय सातत्य आणि झुंजार वृत्तीचे प्रदर्शन केले.
 
 
sharad mahajan
 
Sharad Mahajan पहिल्या फेरीत त्याने धोंड (गोवा) याचा २१-१५, २३-२१ असा पराभव केला. पूर्व-उपान्त्यफेरीत त्याने अनिल कुमार सोंधी (चंदीगड) यांच्यावर २१-१८, २१-१८ असा विजय मिळवला. उपान्त्यफेरीत त्याने सुधीर कुमार गोयल (डेहराडून) यांना २१-१४, २१-१९ असे हरवले. सेमीफायनलमध्ये फिलिप बेंझी यांच्याकडून ९-२१, १०-२१ असा पराभव झाल्याने त्याला कास्य पदक मिळाले. ७०+ पुरुष दुहेरी स्पर्धेत, सतपाल (हरियाणा) यांच्यासोबत जोडी करून या जोडीने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद आणि रौप्यपदक पटकावले. त्यांनी अब्राहम कुराकोस आणि चंद्र सेना एस यांच्यावर खडतर विजयाने सुरुवात केली, त्यानंतर नागेश्वर राव आणि गणेश कुमार पासम, तसेच अनिल मेहरोत्रा आणि अनिल कुमार सोंधी यांच्यावर दणदणीत विजय त्यांनी उपांत्य फेरीत कमल हसन अबिदी व प्रभाकर यांच्यावर वर्चस्व गाजवले, परंतु अंतिम सामन्यात अब्दुल लतीफ आणि क्लेफेंड मेंडेझ यांच्याकडून अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करला आणि २१-१८, ११-२१, १५-२१ अशा फरकाने पात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. बँकर्स स्पोर्ट्स कौन्सिलच्या अधिकार्‍यांनी शरद महाजन यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.