मुंबई,
Sonakshi Sinha बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी वेब सीरीज ‘सिस्टम’मुळे चर्चेत आहे. नुकताच या मालिकेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, लोकांमध्ये एक नवा उत्साह निर्माण केला आहे. मात्र, त्याचवेळी एका महत्त्वाच्या घटनेमुळे सोनाक्षी सिन्हा पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्रीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
सोनाक्षी सिन्हाने न्यायालयात Sonakshi Sinha का धाव घेतली. अभिनेत्रीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, काही एआय बॉट्स तिच्या चेहऱ्याचा, आवाजाचा आणि इतर वैशिष्ट्यांचा गैरवापर करत आहेत. यामुळे तिच्या व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन होऊ शकते. या प्रकरणावर विचार करत असताना, दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सोनाक्षीच्या बाजूने निर्णय दिला आणि तिच्या व्यक्तिमत्व हक्कांना अंतरिम संरक्षण देण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी या प्रकरणाची सुनावणी केली आणि उल्लंघन करणाऱ्या लिंक्सच्या सॉफ्ट कॉपी मागवण्याचे निर्देश दिले. यासोबतच, पुढील सुनावणीसाठी ६ जुलैपर्यंत प्रकरण पुढे ढकलण्यात आले आहे.
अलीकडेच, अनेक सेलिब्रिटींनी Sonakshi Sinha त्यांच्या व्यक्तिमत्व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. यामध्ये सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, करण जोहर, ऋषभ शेट्टी, जया बच्चन, हृतिक रोशन आणि नागार्जुन यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. सोनाक्षी सिन्हाने देखील तिच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे