तळेगावातील घरफोडीप्रकरणी नागपुरातील सराईतास अटक

*दोघे अद्यापही फरार

    दिनांक :23-Mar-2026
Total Views |
तळेगाव (श्या.पं.), 
talegaon-house-burglary-case : रामदरा येथील निवासी मंगेश निळकंठ ठाकरे (४७) यांच्या घरी १८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तळेगाव पोलिसांनी यशस्वी छडा लावला. या प्रकरणी नागपूर येथील सराईत असलम अब्दुल शरीफ खान (२३) रा. हमीद नगर, याला अटक करण्यात आली असून त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.
 

K 
 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळ, परिसरातील तसेच विविध टोल नायांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. यामध्ये कारंजा घाडगे टोल नाका, गौंडखरी टोल नाका आणि नांदगाव पेठ येथील टोल नायांवर संशयित चारचाकी वाहनांच्या हालचाली आढळून आल्या. या धाग्याच्या आधारे पोलिसांनी गोपनीय खबर्‍यांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. या तपासात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील सहायक पोलिस निरीक्षक आशिष सिंह ठाकूर यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावत नागपूर शहरातील रेकॉर्डवरील आरोपी असलम अब्दुल शरीफ खान याला ताब्यात घेतले. २१ मार्च रोजी चौकशीदरम्यान आरोपीने सदर घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. या प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.