Traffic Police वाहतूक पाेलिस चाैकात झाडामागे लपून सावज टिपून दंडात्मक कारवाईच्या नावावर बळजबरी वसुली करतात. मिळेल ती रक्कम ओरबाडून वाहनचालकांची लुटमार करतात, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी गृहमंत्रालयात येत आहेत. त्यामुळे आता वाहतूक पाेलिसांनी कारवाई करताना बाॅडी कॅमेरा लावून कारवाई करणे अनिवार्य केले आहे. गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे वाहतूक पाेलिसांकडून वाहनचालकांची हाेणारी लुटमार थांबणार आहे. मात्र, राज्यभरात बाॅडी वाेर्न कॅमऱ्यांची अपुरी संख्या आणि उपलब्ध कॅमेऱ्यांपैकी अर्धेअधिक कॅमेरे नादुरुस्त असल्याची माहिती समाेर आल्याने कारवाईत नव्याने खाेडा निर्माण हाेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिक आणि वाहनचालकांच्या भावना जाणून घेतल्या.
(संग्रहित छायाचित्र )
Traffic Police वाहतूक पाेलिसांच्या मनमानी कारभाराला आणि वाहनचालकांसाेबत हाेणाऱ्या राेजच्या वादाला पूर्णविराम देण्यासाठी गृहमंत्र्यांनी आता ‘नाे बाॅडी कॅमेरा, नाे चालान’ हे धाेरण अत्यंत कठाेरपणे लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे ज्या वाहतूक पाेलिसांच्या वर्दीवर ‘बाॅडी वाॅर्न कॅमेरा’ नसेल, त्याला दंड वसूल करण्याचा काेणताही कायदेशीर अधिकार राहणार नाही. गृहमंत्र्यांच्या या आदेशामुळे वाहनचालकांची लूट थांबणार आहे. तसेच कायदेशिर कारवाईच्या नावावर लाच घेणे किंवा चिरीमिरी घेण्यावरही नियंत्रण राहणार आहे. रस्त्यावर हाेणारी पैशांची देवाणघेवाण आणि ’सेटलमेंट’ थांबवण्यासाठी हा निर्णय म्हणजे पाेलिसांच्या मनमानीवर घातलेली माेठी वेसण आहे. अनेकदा ट्रॅिफक पाेलिस लपून बसून गाड्या पकडतात किंवा विनाकारण वाहनचालकांना त्रास देतात, अशा तक्रारी गृहमंत्रालयात वाढल्या हाेत्या. ‘वाहतूक नियमांची अंमलबजावणी ही शिस्त लावण्यासाठी असावी, सर्वसामान्य जनतेला लुटण्यासाठी नाही.’ अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी व्यक्त केली हाेती.
नादुरुस्त बाॅडी कॅमेऱ्यांचा खाेडा
राज्यात पाेलिस विभागाला जवळपास वर्षभरापूर्वीच बाॅडी वाेर्न कॅमेरे देण्यात आले हाेते. मात्र, त्यापैकी जवळपास अर्धेअधिक कॅमेरे नादुरुस्त आहेत. वाहतूक पाेलिसांना कॅमेरे लावणे अनिवार्य केल्यानंतर काही दिवस ते लावण्यात आले. मात्र, त्यानंतर वरिष्ठांच्या दुर्लक्षित धाेरणामुळे ते कॅमेरे कार्यालयात धूळ खात पडले हाेते. त्यामुळे काही नादुरुस्त आहेत तर माेजकेच कॅमेरे सुस्थितीत आहेत. त्यामुळे वाहतूक पाेलिसांच्या कारवाईत नादुरुस्त कॅमेèयांचा खाेडा नक्कीच राहणार आहे.
वाहनचालकांची मनमानी थांबणार
Traffic Police काही वाहनचालक माेठमाेठ्या नेत्यांची नावे सांगून किंवा राजकीय पद, हुद्दा दाखवून वाहतूक पाेलिसांशी हुज्जत घालतात. कारवाई करताना अडथळा निर्माण करतात. पाेलिसांना मारहाण किंवा शिवीगाळ केल्याचे काही प्रकरणे समाेर आली आहे. वर्दीवरील कॅमेऱ्यांमुळे हा सर्व प्रकार बंद हाेणार आहे. तसेच कायदेशिर कारवाई करताना कॅमेèयातील व्हिडिओ पुरावा म्हणून सादर करण्यात येणार आहे.