हिंदूंनी कट्टरता अंगीकारावी : शिवव्यंकटेशानंद भारती

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
पुलगावात विशाल हिंदू संमेलन
 
पुलगाव, 
हिंदू समाजाने कट्टरतेने धर्माचरण करावे. जशास तसे आचरण करावे. देशाला प्रथम प्राधान्य द्यावे, तरच हे राष्ट्र परम वैभवाला प्राप्त होईल असे प्रतिपादन हरिद्वारच्या भूमाशती पिठाचे पिठाधीश्वर Shivvyankateshananda Bharati शिववेंकटेशानंद भारती यांनी केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने गांधीनगर परिसरामध्ये आयोजित विवेक वस्तीच्या विशाल हिंदू संमेलनात प्रमुख वते म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून युवा कीर्तनकार व शिवचरित्रकार हभप पुनम ठोंबरे (दुर्गे) होत्या तर अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देशमुख होते.
 
 
bharti
 
Shivvyankateshananda Bharati ते पुढे म्हणाले की, हिंदू धर्मामध्येच महिलांना सन्मानाने वागणूक दिली जाते. त्यामुळे सन्मानाने जगायचं असेल तर हिंदुत्वाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. राष्ट्रभत मुस्लिमांचा आम्ही सन्मान करतो. परंतु, देशद्रोही कृत्य करणार्‍या नापाक लोकांना धडा शिकवणे आवश्यक आहे. त्याकरिता सहिष्णुता सोडून कट्टरता स्वीकारणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक मनिषा देशमुख यांनी केले. संकेत बाबळे यांनी गायलेल्या वैयक्तिक गीताने वातावरण भारावून गेले. ह भ प पुनम दुर्गे यांनी हिंदू धर्माचे आचरण आपल्या दैनंदिन व्यवहारात करणे,आवश्यक असून आपल्या धर्म,परंपरा याबद्दल अभिमान बाळगणे आवश्यक आहे, असे सांगितले. संचालन वर्षा बाभळे यांनी केले.