भाजपा मंडल अध्यक्ष विनोद बघेल यांचा सत्कार

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
नागपूर,
BJP Mandal सुरेंद्रगड मेन रोडची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे येथे वारंवार अपघात घडत होते. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या भाजपा मंडल अध्यक्ष विनोद बघेल यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

BJP Mandal
 
त्यानुसार सुरेंद्रगड मेन रोडच्या सुधारणा व सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रयत्नांबद्दल सुरेंद्रगड येथील नागरिक व कार्यकर्त्यांनी विनोद बघेल यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. BJP Mandal तसेच, रस्त्याच्या कामाला गती मिळाल्याबद्दल सर्व नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार व्यक्त केले.
सौजन्य: महादेव  दमाहे, संपर्क मित्र