मंगरूळनाथ,
तालुयातील Chikhalgarh case चिखलागड येथे दोन गटात वाद होऊन दोन्ही गटांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी दोन्ही गटातील १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार ओम जाधव (वय २४) रा. चिखलागड यांनी तक्रार दिली की, माझा व आरोपीचा घरासमोरील जाण्या येण्याचे रस्त्याचा जुना वाद असून, सदर रस्त्याचे प्रकरण विस्तार अधिकारी मंगरूळनाथ यांच्याकडे चालु आहे. सदर प्रकरणात आरोपीतांनी ग्राम पंचायतची नोटीस प्राप्त झाल्याने २२ मार्च रोजी सकाळी आरोपी विशाल जाधव, गिरधरी जाधव, महेश जाधव, तुळशीराम जाधव, विजय जाधव, सविता जाधव, प्रफुल जाधव, रंजना जाधव, धृपदा जाधव, संगीता जाधव यांनी चिडून गैरकायद्याची मंडळी जमवून आईला व वहिनीला लाथाबुयाने मारहाण करून शिविगाळ केली. मी व भाऊ सोडविण्यास गेलो असता आरोपीतांनी मोठा भाऊ यास कुर्हाडीने डोयावर मारून जखमी केले. तसेच लोखंडी रॉडने पाठीवर मारहाण करून माझ्या छातीवर चाकु मारण्याचा प्रयत्न केला. आईला, वहिनीला व भावाला मारहाण करून शिवीगाळ करून जिवाने मारण्याच्या धमया दिल्या. अशा तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास एएसआय महादेव सोळंके करीत आहेत.
Chikhalgarh case तर दुसर्या गटाकडून एका अल्पवयीन मुलीने तक्रार दिली की, २२ मार्च रोजी सकाळी तक्रारदार व तिची आई घरी हजर असताना आरोपी गोकुळ जाधव, ओम जाधव, गणेश जाधव, मोहित जाधव यांनी आईस म्हटले की, तुमचे कुत्र्याने घरासमोरील चप्पल व झाडु नेले. तर आईने त्यांना म्हटले की, ती मुके जनावर आहेत, नेले असतील तर आरोपीतांनी वाद करून मारहाण केली. मी सोडवण्यास आली असता मला सुध्दा थापडा बुयांनी मारहाण केली व गोकुळ जाधव याने विनयभंग केला. वडील सोडवण्यास आले असता त्यांना सुध्दा थापडा बुयांनी मारहाण केली व ओम जाधव ने वडीलाच्या उजव्या हाताचे बोटावर मारहाण केली. त्यामुळे जखम झाली व रक्त निघाले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय देविदास पत्रे करीत आहेत.