अमरावतीत उद्योगवृद्धीसाठी बैठक घेणार

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
मंत्री डॉ. उदय सामंत यांची ग्वाही
आमदार संजय खोडकेंच्या प्रश्नाला उत्तर
 
अमरावती, 
अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी अमरावतीत संबंधित अधिकार्‍यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल अशी माहिती मंत्री Dr. Uday Samant डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.सदस्य संजय खोडके यांनी नियम ९७ अन्वये या विषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती.
 
 
samant
 
त्याला उत्तद देताना मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, अमरावती विभागात एमआयडीसीची दोन प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत. या विभागात एकूण ४६ औद्योगिक क्षेत्रे असून सुमारे ९८३७.९८ एकर क्षेत्रावर एमआयडीसीची उभारणी झाली आहे. देशातील सात पीएम टेक्स्टाईल पार्कपैकी अमरावतीचे पार्क सर्वाधिक सुसज्ज, अत्याधुनिक आणि पायाभूत सुविधांनी युक्त आहे. या ठिकाणी जमीन दर पूर्वी २१०० रुपये होता, मात्र उद्योजकांशी चर्चा करून तो ५९० रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. पुढील एक वर्ष ५९० रुपये दराने जमीन उपलब्ध करून देण्याची भूमिका शासन घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
Dr. Uday Samant राज्यात उद्योग धोरणाबरोबरच जेम्स अँड ज्वेलरी, बांबू, लेदर, आयटी, डेटा सेंटर अशा विविध क्षेत्रनिहाय स्वतंत्र धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणानुसार अमरावतीचा ‘उद्योजन्मुख जिल्हा’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. रेमंड कंपनीने अमरावतीत सुमारे ५०० एकर जमीन घेतली असून त्यापैकी केवळ ३० ते ३८ एकरावरच प्रकल्प उभारला आहे. उर्वरित जागेबाबत कंपनीसोबत बैठक घेण्यात येईल. एमआयडीसीतील जमीनवाटप प्रक्रिया आता पूर्णपणे सुलभ आणि पारदर्शक झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.