शहरात अवैध सावकारीप्रकरणी १६ ठिकाणी धाडी

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
सहकार विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई: वाशीमच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग

अकोला-
शहरात Illegal money lending case अवैध सावकारी करीत असल्याबाबतच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार खात्यातील अकोला व वाशीम जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी नऊ अर्जदारांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार १६ ठिकाणी धाडी टाकून आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त केले आहे.चौकशीनंतर संबंधितांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियमाद्वारे कारवाई होईल.
 
 
savkari
जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन, जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभाग व पोलीस प्रशासन यांनी एकत्र येत शहरातील अवैध सावकारी विरोधात धाडसत्र राबविले यामध्ये नऊ तक्रार करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने १६ ठिकाणी कारवाई करण्यात आली.यामुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच सावकारग्रस्त व्यक्तींनी संबंधितांच्या विरुद्ध तक्रार केल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवून या तक्रारीची दखल घेतली जाईल. शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन तक्रारी दाखल करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गितेशचंद्र साबळे यांनी केले आहे.
आक्षेपार्ह दस्तऐवजांची होणार चौकशी
Illegal money lending case टाकलेल्या धाडीत शोध कार्यामध्ये इसार पावती, कोरे चेक, कोरे बॉण्ड,मूळ व झेरॉक्स खरेदीखत, डायरेक्ट ताबा विक्री पावती, करारनामा, गहाणखत, सातबारा, रोकडवही खाता वही, इत्यादी आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले. या कागदपत्रांची चौकशी व पडताळणी केल्यानंतर तक्रारीमध्ये व प्राप्त कागद कागदपत्रे मध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित गैरअर्जदार यांचे विरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम अंतर्गत कारवाई केली जाईल.
 
 
पथकात सहभागी अधिकारी-कर्मचारी
एम.डी कछवे, आर.आर विटनकर, डी.यु शेगोकार, पी.टी. सरकटे, जी.आर फाटे, सर्व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, ए.एम भाकरे, बी. डब्ल्यू.सिरसाठ, मनसुटे, नरवाडे वाय. पी. लोटे, एस. एन. खान, पी. आर. वाडेकर, एस. एस पाटील यांच्यासह फिरते पथकामध्ये ज्योती मलीये उपनिबंधक सहकारी संस्था, अभयकुमार कटके सहकारी निबंधक संस्था अकोला,अनिल मनवर कार्यालय अधीक्षक, आशिष घाटोळे कनिष्ठ लिपिक सहकारी संस्था यांचा समावेश होता.