पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय जलदिवस साजरा

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
कामठी
Porwal Junior College पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय, कामठी येथे आंतरराष्ट्रीय जलदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल होते. यावेळी पर्यवेक्षक प्रा. विश्वनाथ वंजारी, डॉ. नीता वानखेडे व पर्यावरण विभागाच्या प्राध्यापिका सुषमा ओझा उपस्थित होत्या.प्रा. विश्वनाथ वंजारी यांनी आपल्या भाषणातून “जल है तो कल है” या संकल्पनेवर भर देत पाणी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. पाण्याचा काटकसरीने वापर व पावसाच्या पाण्याचे संधारण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
Porwal Junior College
 
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल यांनी पाण्याचा वाढता अपव्यय व प्रदूषण यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका व्यक्त करत “पाणी अडवा, पाणी जिरवा” यांसारख्या उपक्रमांची गरज अधोरेखित केली.प्रास्ताविक प्रा. सुषमा ओझा यांनी केले. Porwal Junior College संचालन ॲमीलिया जेम्स व हदीसा फातिमा यांनी, तर आभार प्रदर्शन जमजम शिफा यांनी केले. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा होता.कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी “शांततेसाठी पाणी” व जलसंधारण या विषयांवर आधारित पोस्टर, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सौजन्य: डॉ. सुधीर अग्रवाल, संपर्क मित्र