पराभवाची आठवण आजही चाहत्यांच्या मनात!

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
काबुल,
memory of the defeat पाकिस्तानविरुद्धच्या एका पराभवानंतर अफगाणिस्तानमध्ये काही चाहत्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज यांनी एका मुलाखतीत बोलताना या पराभवामुळे देशातील अनेक लोक मानसिकदृष्ट्या खूपच खचले होते, असे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, काहींनी हा पराभव इतका गंभीरपणे घेतला की त्याचे परिणाम अत्यंत दुःखद स्वरूपात दिसून आले.
 
 
 
Batsman Rahmanullah Gurbaz
हा संदर्भ २०२२ मध्ये झालेल्या आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याशी जोडला जात आहे, ज्यात अफगाणिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात सुरुवातीला अफगाणिस्तानने आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती, मात्र पाकिस्तानने शेवटच्या षटकात विजय मिळवत सामना आपल्या बाजूने फिरवला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये तणावपूर्ण वातावरणही निर्माण झाले होते.त्यांनी पुढे सांगितले की, खेळाडू म्हणून तेही आपल्या चाहत्यांसाठीच मैदानात उतरतात आणि त्यामुळे त्यांचा आनंद आणि दुःख थेट लोकांच्या भावनांशी जोडलेले असते. त्या पराभवाची आठवण आजही त्यांच्या मनात ताजी असल्याचे त्यांनी नमूद केले.