जंतर-मंतरवर ओबीसी जनगणनेसाठी आंदोलन

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Protest for OBC राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बी.सी. वेल्फेअर असोसिएशन व ओबीसी महासभेच्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे ओबीसी जनगणना व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी केले. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, आसाम यांसह विविध राज्यांतील मोठ्या संख्येने ओबीसी बांधव यात सहभागी झाले होते. डॉ. तायवाडे यांनी ओबीसी जनगणनेची मागणी करत, केंद्र सरकारने तातडीने स्वतंत्र जनगणना करावी, ओबीसी मंत्रालय स्थापन करावे, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करावी, क्रिमीलेयर मर्यादा वाढवावी तसेच UGC 2026 विधेयक लागू करावे, अशी मागणी केली.
 
Protest for OBC
 
या आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार बळवंत वानखेडे, खासदार नामदेवराव किरसाण, खासदार बाळूमामा म्हात्रे, खासदार प्रशांत पडोळे, खासदार कल्याण काळे तसेच विविध राज्यांतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Protest for OBC धरणे आंदोलनाचे प्रास्ताविक सचिन राजूरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रकाश साबळे यांनी केले आणि समारोप शेषराव येलेकर यांनी केला. यानंतर संध्याकाळी आंध्रप्रदेश भवन येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होऊन बंगळुरू येथील ११व्या अधिवेशनाच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.
सौजन्य: परमेश्वर राऊत, संपर्क मित्र