नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सोमलवार शाळेची झळाळी

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Somalwar School सोमलवार निकालस शाळेतील विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन, नवी दिल्ली द्वारा आयोजित नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड (NSO) २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदके जिंकून शाळेचा गौरव वाढवला आहे. या स्पर्धेत इयत्ता दुसरीतील समर्थ निखाडे, श्रीयुत झंझाळ, वेदांत दुबे, स्विकृत भुरे, इयत्ता तिसरीतील प्रियांक कोळणकर, वृषांत क्षीरसागर, जिवंतिका राऊत तसेच इयत्ता चौथीतील मैत्रेयी धनोरकर, धीरा खांते आणि रुद्र मानके यांना “गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स” प्रदान करण्यात आले.

Somalwar School
या यशाबद्दल सोमलवार अकॅडमीचे सचिव प्रकाश सोमलवार, मुख्याध्यापिका अदिती डोळे, पर्यवेक्षिका अश्विनी ठोसर तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Somalwar School या विद्यार्थ्यांना माधवी पांढरीपांडे, निलीमा हरगुडे आणि पूर्वा माटे यांचे मार्गदर्शन लाभले.
सौजन्य: माधवी पांढरीपांडे, संपर्क मित्र