अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची सूरजची इच्छा

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |

sooraj chavhan
 
 
 
पुणे,
Sooraj wants to work with Allu Arjun ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरलेला सूरज चव्हाण आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. एका मुलाखतीत त्याने ही इच्छा उघडपणे बोलून दाखवली असून, दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. दाक्षिणात्य कलाकारांचे काम आणि तेथील चित्रपटांतील अॅक्शन त्याला खूप आवडते, असे तो म्हणाला. त्या पद्धतीनेच आपणही उत्तम काम करू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. याच मुलाखतीत त्याने अभिनेता सयाजी शिंदे यांच्याशी ओळख झाल्यास त्याला मोठी संधी मिळू शकते, असे मत मांडले. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो, असेही सूरजचे म्हणणे आहे.