मानोरा,
Veterinary clinic locked शहर आणि नेमून दिलेल्या पंचक्रोशीतील शेतकरी व पशुपालकांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी स्थानिक पशुधन विकास अधिकारी यांचा दवाखाना कर्मचारी सुट्टीवर असल्यामुळे आणि ज्यांच्याकडे प्रभार आहे ते सुद्धा बाहेरगावी असल्यामुळे हा दवाखाना पूर्णपणे वार्यावर राहत असल्याने आजारी गुरांना दवाखान्यातून आल्या पावली परत जाण्याची पाळी शेतकर्यांवर येत असल्यामुळे या दवाखान्याचा पशुपालक आणि शेतकर्यांना उपयोग काय ? असा संतप्त सवाल विचारल्या जात आहे.
Veterinary clinic locked मानोरा शहर व नेमून दिलेल्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांसाठी स्थानिक पंचायत समिती कार्यालय परिसरात शासकीय गुरांचा दवाखाना असून, येथे पाळीव गुरे आजारी पडल्यास त्यांना आजारावर उपचार करण्यासाठी पशुपालक अथवा शेतकरी घेऊन आले तर हा दवाखाना सकाळी कार्यालयीन वेळेत कुलूप बंद असते. गुरांचा दवाखाना कुलूप बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी येथे नेमणुकेला असलेले डॉ. रोम यांना भ्रमणध्वनीवर संवाद साधला असता शेतकर्यांना संबंधित डॉटर उत्तरे देत नाहीत आणि पुढार्यांनी संपर्क साधल्यास मी रजेवर आहे असे त्यांच्याकडून उत्तर देण्यात येते.येथे नेमणुकीला असलेले डॉ. रोम हे सुट्टीवर असल्याची माहिती स्थानिक पुढार्याकडून प्राप्त झाल्यावर ज्यांच्याकडे प्रभार आहे ते सुद्धा मी पोहरादेवीला आहे अशी माहिती प्रत्यक्ष शेतकर्यांना सबंधित देतात. मानोरातील स्थानिक पुढार्यांनी फोन केला तर त्यांना मात्र हे कर्मचारी उत्तरे देत असल्यामुळे पशुपालक आणि शेतकर्यांची यांना एवढी अॅलर्जी का आहे व आजारी गुरांचा उपचार कुठे करावा असा यक्षप्रश्न उपस्थित होत आहे.