पाणपोई नसल्याने वाटसरूंची पाण्यासाठी भटकंती

उन्हाची दाहकता वाढली

    दिनांक :24-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
darvha-news : दारव्हा शहरासह व ग्रामीण भागात उन्हाची चाहूल लागली तसेच तीव्रता वाढू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर पाणपोई उभारल्या जायच्या. परंतु आज पाणपोईची संख्या कमी झाल्यामुळे प्रवासी, कामगार, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातून येणाèया नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
 
 
j
 
 
 
दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागासह दारव्हा शहरातील मुख्य चौक, बसस्थानक, बाजारपेठ, शासकीय कार्यालय परिसर, रुग्णालयाजवळ तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि दानशूर व्यक्तींच्या पुढाकारातून पाणपोई सुरू केल्या जात असत.
 
 
तहानलेल्या प्रवाशांना मोफत थंड पाणी देण्याची ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र गेल्या काही वर्षांत ही परंपरा हळूहळू कमी होत चालली असून यंदा तर मोजक्याच ठिकाणी पाणपोई दिसून येत आहेत.
 
 
शहरात वाढती वाढलेली वर्दळ, वाढलेली असताना अनेक ठिकाणी पाणपोई बंद झाल्याचे चित्र आहे. परिणामी कडक उन्हात फिरणाèया नागरिकांना बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते, ते अनेकांना घेणे शक्य नाही. तर पाणपोई हा आधार होता असे बोलताना दिसतात.
 
 
सध्या सामान्य जनांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद, सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि व्यापारी संघटनांनी पुढाकार घेऊन शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पाणपोई सुरू कराव्यात, अशी अपेक्षा आहे.
शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका; वैद्यकीय तज्ञांचा सल्ला
 
 
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे चक्कर येणे, उष्माघाताचा धोका वाढतो. वारंवार पाणी पिणे, डोके झाकून ठेवणे, सुती कपडे वापरणे गरजेचे आहे. दुपारचे कडक ऊन टाळणे आवश्यक आहे. लहान मुले व ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. गोपाल जामदारकर यांनी दिला.
ग्रामीण भागातही पाणपोई झाल्या कमी
 
 
शहरांसह ग्रामीण भागातही पाणपोईंची संख्या अत्यंत कमी दिसून येत आहे. पूर्वी गावोगावी चौकात, मंदिराजवळ, बसथांब्यावर तसेच बाजाराच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात होती. मात्र आता अनेक गावांत ही परंपरा थांबली आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर, प्रवासी आणि विद्यार्थ्यांना कडक उन्हात पाण्याविना त्रास सहन करावा लागत आहे. पाणपोई पूर्ववत सुरू व्हाव्या, अशी नागरिकांकडून मागणी आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.