राज्यात जिपतील विद्यार्थ्यांच्या नासा भेटीसाठी ३.३० कोटी!

ना. भोयर यांच्या ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’कल्पनेला मुख्यमंत्री फडणवीसांचा होकार

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
student science fair विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रवृत्ती जागृत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनांमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी सुरू करण्याची संकल्पना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना केल्या. प्रस्ताव सादर होताच‘ मुख्यमंत्री विज्ञानवारी’ला मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थी, त्यांच्यासोबत असलेल्या समन्वयक, शिक्षक यांच्या प्रवास, व्हिसा, निवास व इतर खर्चासाठी ३ कोटी ३० लाख रुपयांच्या खर्चाला शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
 
 

student science fair 
 
 
राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित विषयाबाबत आवड निर्माण होण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शने आयोजित केले जातात. या स्पर्धेमध्ये अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येतो. परंतु, हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात प्रचलित नाही.
विज्ञान व तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांची रूची वाढविण्यासाठी या व्यासपीठाची व्याप्ती व महत्त्व वाढविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विज्ञान प्रदर्शनांमध्ये पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना शासनाने नागपूर येथील रमण सायन्स सेंटर, बंगळुरू येथील इस्त्रो व अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील नासा या विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठीत व मानबिंदू असलेल्या संस्थाना भेटी देण्यासाठी पुरस्कृत केल्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, ही विज्ञान प्रदर्शने राज्यात अधिक व्यापक व प्रेरणादायी व्हावी, याकरिता तालुकास्तरावर निवड झालेल्या २१ विद्यार्थ्यांना रमण सायन्स सेंटर, जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ५१ विद्यार्थ्यांना इस्त्रो तर राज्यस्तरावरील उत्कृष्ट ५१ विद्यार्थ्यांना थेट नासा केंद्राला भेट देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने प्रस्ताव मागवला होता. प्रस्ताव सादर केल्यानंतर मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीला मंजुरी देण्यात आली आहे.
 
राज्यातील तालुकास्तरावरील विज्ञान प्रदर्शनात निवड झालेल्या २१ विद्यार्थ्यांना (राज्यातील ३५८ तालुयातील २१४८ विद्यार्थी व २० पर्यवेक्षक / शिक्षक) यांना नागपूर येथील रमन सायन्स सेंटर, पुणे येथील पिंपरी-चिंचवड सायन्स सेंटर किंवा मुंबई येथील नेहरू तारांगण यापैकी जे विज्ञान केंद्र जवळ असेल त्या ठिकाणी भेट देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील जिल्हास्तरावरील प्राथमिक व माध्यमिक मधून सर्वसाधारण, दिव्यांग आणि आदिवासी गटातून निवड झालेल्या १८० विद्यार्थी व ८ पर्यवेक्षक/शिक्षक यांना इस्त्रो केंद्राला भेट देण्यास मान्यता देण्यात आली आहे.student science fair राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी उत्कृष्ट ५१ विद्यार्थी, १ शिक्षक, १ शिक्षिका व २ प्रशासकीय अधिकारी/समन्वयक अशा ५५ व्यतींना अमेरिका येथील नासा केंद्राला भेट देण्यास व याकरिता खर्चास मान्यता दिली. राज्यातील तालुकास्तर व जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरील जिल्हा नियोजन योजनेत तरतूद करून निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 
राज्यस्तरावर निवड होणार्‍या विद्यार्थ्यांना अमेरिका येथील नासा केंद्रास भेट देण्यासाठी ५१ विद्यार्थी व सोबतच्या अधिकारी, समवन्वयक व शिक्षकांचा विमान प्रवास खर्च, व्हिसा खर्च, निवास व्यवस्था व स्थानिक प्रवास खर्चास प्रतिव्यती ६ लाख याप्रमाणे ५५ व्यतींच्या ३.३० कोटी इतया खर्चास सहायक अनुदाने या लेखाशिर्षाखाली उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.